जामखेड- तीन जिल्हयाच्या सरहद्दीवर असणार्या जामखेड तालुक्याची आर्थीक उलाढाल खर्या अर्थाने जामखेडच्या शनिवारी असणार्या आठवडे बाजारावर अवलंबुन आहे. कारण या बाजारासाठी शेजारील असणार्या करमाळा, पाटोदा, आष्टी, भूम, परंडा या तालुक्यातील लोक आपला शेती माल, भाजीपाला, फळे व इतर जीवनोपयोगी वस्तू विक्रीस आणतात, त्याचप्रमाणे काही लोक याच वस्तुंच्या खरेदीसाठी आवर्जुन जामखेडच्या शनिवार या आठवडे बाजारास पसंती देतात, त्यामुळे खरेदी व विक्री व्यवहारांतुन जामखेडचे व्यापारी दुकानदार तसेच खरेदीदार ग्राहक यांचा आपापल्या सोयीनुसार फायदा होत असतो, त्यामुळे जामखेडच्या शनिवार आठवडे बाजारास एक वेगळे महत्व असुन यादिवशी जामखेड मध्ये एकच गर्दी दिसुन येते. त्याचप्रमाणे बैल बाजारदेखील जामखेडकरांचे खरे वरदान म्हटले तरी काही वावगे ठरणार नाही, कारण शेतकर्यांकडे असणारे पशुधन म्हणजे गाय, बैल, म्हैस, शेळी, मेंढी इत्यादी जनावरांची खरेदी आणि विक्री या बैल बाजारात लाखो रूपयांची उलाढाल करत असते, त्यातुन शेतकरी, शेतमजुर, व्यापारी, मध्यस्थी, दलाल तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती आदी सर्वांना यातुन पैसे मिळत असतात. यातुनच तालुक्याचा आर्थीक आलेख उंचावत असतो, परंतु जामखेड तालुक्यासह शेजारील चारही तालुक्यातुन ऊस तोडणीसाठी पन्नास ते साठ टक्के शेतकरी व शेतमजुर गेले असल्याने आता मात्र जामखेड बाजारावर मंदी आल्याचे स्पष्ट जाणवत असुन बैल बाजारासह इतर क्षेत्रातील खरेदी विक्री संथगतीने चालु आहे.
आठवडे बाजार ओसाड होण्याच्या मार्गावर
Reviewed by Dainik Lokmanthan
on
13:00
Rating: 5