वाघाचा धुमाकूळ; मेंढराच्या कळपात घुसून घोडीचा फडशा
बालाजी देडगाव / प्रतिनिधी / - नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे गेल्या ८ दिवसापासुन वाघाने धुमाकूळ घातला. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. नुकतीच वाघाने बालाजी देडगाव ते कौठा रस्त्यालगत असलेल्या मेंढराच्या कळपात घुसून घोडीचा फडशा पाडला.
गावापासून काही अंतरावर बालाजी देडगाव ते कौठा रस्त्यालगत रामनाथ दत्तू गोयकर व त्यांचे बंधू सखाराम गोयकर हे मेंढपाळ मेंढ्याचा कळप घेऊन थांबले असता, रात्री अचानक त्यांना मेंढ्याचा व शेळ्यांचा ओरडण्याचा आवाज आला. तेव्हा गोयकर बंधू आवाजाच्या दिशेने धावले असता त्यांना तेथे वाघ घोडीला ओढताना दिसला त्यांनी आरडओरड केली. तेव्हा शेजारी कळप करून राहणारे इतर मेंढपाळ धावत आल्याने वाघाने तेथून पळ काढला . परंतु तोपर्यंत वाघाने घोडीचा फडशा पाडला होता .

या घटनेच्या आदल्या दिवशी तेथून जवळच सेवा संस्थेचे माजी उपाध्यक्ष संतोष तांबे यांच्या उसात वाघाचे दर्शन झाल्याने ऊस तोडणार कामगारांनी तेथून पळ काढला होता . तसेच त्या परिसरात अनेकांनी वाघाची डरकाळी ऐकल्याचे सांगतात . या परिसरात तूर , ज्वारी व उसाचे पिक मोठ्या प्रमाणावर असल्याने वाघाला लपण्यास भरपूर जागा आहे परंतु यामुळे शेतकरी वर्ग मात्र भयभीत आहे.
या घटनेची माहिती ग्रामपंचायत सदस्य भारत कोकरे, गणेश औटी यांनी संबधित माहिती वनाधिकारी यांना दिली. वनाधिकारी ढेरे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिंदे व डॉ.थोरात हे घटनास्थळी दाखल होत पंचनामा व पोस्टमाटम केले . यावेळी ग्रामपंचायत सदस्य भारत कोकरे, गणेश औटी , पत्रकार बन्सीभाऊ एडके , निलेश कोकरे , सोपान मुंगसे , जोजेफ हिवाळे , नारायण टकले ,बाबासाहेब चेडे , मचीन्द्र कोकरे आदी उपस्थित होते. या परिसरात एकापेक्षा जास्त वाघ असल्याची चर्चा नागरिकात आहे. यापूर्वी बालाजी देडगाव येथुन दोन वाघ जेरबंद करण्यात आले आहेत .