Breaking News

दिवसभरात 314 ठिकाणी महापालिकेची कारवाई

मुंबई, बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील उपाहरगृहे, हॉटेल्स इत्यादींमधील अनधिकृत / बेकायदेशीर बाबींची तपासणी करण्याचे व त्यानुसार कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सर्व 24 विभागांच्या सहाय्यक आयुक्तांना काल दिले होते. त्यानुसार आज महापालिकेच्या सर्व विभागांमध्ये विशेष चमूंचे गठन करुन त्याद्वारे उपहारगृह, हॉटेल्स, मॉल्स इत्यादींमध्ये मोहिमस्वरुपात तपासणी करण्यात आली आहे. या तपासणी दरम्यान आढळून येणारी अनधिकृत वा वाढीव बांधकामे तात्काळ तोडण्यात आली आहेत.


आजच्या कारवाई दरम्यान तपासणी करण्यात आलेल्या 624 ठिकाणांपैकी अनियमितता / अनधिकृत बांधकामे आढळून आलेल्या 314 ठिकाणी तोडकाम कारवाई करण्यात आली आहे. तर 7 उपहारगृहे सील करण्यात आली आहेत. त्याचबरोबर 417 पेक्षा अधिक सिलिंडर देखील आजच्या कारवाई दरम्यान जप्त करण्यात आले आहेत.
या कारवाईसाठी सर्व 24 विभागांमध्ये प्रत्येकी 3 चमू तयार करण्यात आल्या आहेत. यात विविध संबंधित खात्यातील कामगार-कर्मचारी-अधिकारी यांचा समावेश आहे. या व्यति रिक्त संबंधित सहाय्यक आयुक्त, उपायुक्त व अतिरिक्त महापालिका आयुक्त घटनास्थळी उपस्थित राहून पर्यवेक्षकीय काम करित आहेत. तसेच अग्निशमन दलाचे अधिकारी व क र्मचारी कार्यरत होते. याप्रमाणे एकूण महापालिकेचे सुमारे 1 हजार कामगार-कर्मचारी-अधिकारी या कामी आज कार्यरत होते.

विशेष म्हणजे पालिकेच्या इतिहासात प्रथमच तिन्ही अतिरिक्त आयुक्त तोडक कारवाई सुरु असलेल्या ठिकाणी स्वत: उपस्थित होते. यामध्येअतिरिक्त आयुक्त (पश्‍चिम उपनगरे) आय. ए. कुंदन, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) विजय सिंघल, अतिरिक्त आयुक्त (शहर) आबासाहेब ज-हाड यांचा समावेश आहे.
याशिवाय, महापालिकेद्वारे सर्व संबंधित उपाहरगृहे, हॉटेल्स, मॉल्स यांना सूचित करण्यात येत आहे की, त्यांनी आपल्या स्तरावर अग्निसुरक्षेसह सर्व बाबींची तपासणी करावी व नियमांनुसार आवश्यक त्या सुधारणा तातडीने करवून घ्यावात. अन्यथा, ज्या ठिकाणी नियमबाह्य व बेकायदेशीर बाबी आढळून येतील, त्या तात्काळ तोडण्यात येतील.