"माझी शाळा,स्वच्छ सुंदर शाळा" या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन
नेवासा/ शहर प्रतिनिधी/- जिल्ह्याचे नेते व जेष्ठ विचारवंत साहित्यिक माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या अमृत महोत्सवानिमित्त नेवासा तालुक्यातील जिल्हा परिषद व मराठी माध्यमिक शाळांकरीता गटानुसार "माझी शाळा,स्वच्छ सुंदर शाळा" हा उपक्रम राबविण्यात येत असून प्राथमिक व मराठी माध्यमिक शाळांनी या उपक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे. असे आवाहन पंचायत समितीच्या सभापती सुनीता गडाख यांनी केले आहे.
या उपक्रमात सहभागी होणाऱ्या मराठी प्राथमिक शाळांकरिता प्रथम बक्षीस अजित मंडलिक यांचेकडून ११,१११/-दुसरे बक्षीस पंचायत समिती सदस्य रावसाहेब कांगुणे यांचेकडून ७,७७७/-तिसरे बक्षीस दीपक भाऊ धनवटे सोनई यांचेकडून ५, ५५५/-
तर माध्यमिक शाळांकरिता पहिले बक्षीस जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब शेळके यांच्याकडून ११, १११/- दुसरे बक्षीस पंचायत समिती सदस्य किशोर जोजार यांच्याकडून ७, ७७७/- तर तिसरे बक्षीस भाऊसाहेब सोनवणे यांच्याकडून ५,५५५ /- रुपये अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
या उपक्रमात सहभागी होणाऱ्या शाळांकरिता कार्यवाहीचा तपशील व कालावधी पुढीलप्रमाणे :-शाळा पातळीवर दि.८ जानेवारी १२ जानेवारी,केंद्र स्तरावर १५ जानेवारी ते १९ जानेवारी,बिट स्तरावर २२ जानेवारी ते २६ जानेवारी, आणि तालुकास्तरावर दि.२९ जानेवारी ते ३१ जानेवारी असा असून, माझी शाळा स्वच्छ सुंदर शाळा या उपक्रमात शालेय परिसर,वर्ग,स्वच्छतागृह,वैयक्तीक स्वच्छता,सर्व प्रकारचे अभिलेख यांचा समावेश रहाणार आहे.
वरील स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्राथमिक व मराठी माध्यमिक शाळांनी शिक्षण विभाग नेवासा पंचायत समिती, बिटनिहाय स्तरावर पाटेकर -९७६५०४६७०१, पवार (खरवंडी) ९९७५२७७८२७, फाटके-कुकाणा ९४२०६४१६९५, हारदे -घोडेगाव-९८३४९१८२८४या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. तसेच प्राथमिक व मराठी व उर्दू शाळे सह माध्यमिक शाळांनी देखील या उपक्रमात सहभागी व्हावे. असे आवाहन सुनीताताई गडाख, उपसभापती राजनंदिनी मंडलिक, गटविकास अधिकारी सुधाकर मुंढे,गटशिक्षण अधिकारी विलास साठे व पंचायत समिती सदस्यांनी केले आहे.