Breaking News

किम जोंग उनसोबत फोनवर चर्चेस तयार -ट्रम्प.


कॅम्प डेव्हिड : उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यातील तणाव विकोपाला गेलेला असताना अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनसोबत फोनवरून चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियामध्ये सकारात्मक चर्चा होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. दोन वर्षात पहिल्यांदाच उत्तर कोरियाने शुक्रवारी दक्षिण कोरियासोबत चर्चा करण्याची तयारी दाखवली होती. त्यानुसार दोन्ही देशात पुढच्या आठवड्यात चर्चा होणार आहे. यासंदर्भात बोलताना अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही उनसोबत पूर्वअटीच्या शर्तीवर फोनवरून चर्चा करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.