Breaking News

चांदबिबी महालाजवळ फाशी घेण्याचा इशारा , पालीभाषा केंद्र मागणीचा केला होता प्रस्ताव

जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी नगर विभाग (प्रांत) यांच्या ना करतेपणामुळे आगामी प्रजासत्ताक दिनादिवशी म्हणजेच 26 जाने. 2018 रोजी नगर पाथर्डी रोडवरील चांदबिबी महालाजवळील वनविभाग गट नं. 213अ मध्ये झाडाला लटकून फाशी घेणार असल्याचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रबुद्धनगर , भिंगार येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच सम्राट अशोक चैत्यवन विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मोहन ठोंबे यांनी पोष्टाद्वारे पाठविले आहे.


या संस्थेमार्फत सारोळा बद्धी, ता. नगर येथील फॉरेस्ट सर्व्हे नं. 117 गट नं. 213 अ. मधील 40 आर वनक्षेत्र प्राथमिक शैक्षणिक आणि पालिभाषा केंद्र मागणीसाठी प्रस्ताव सादर करून शासनाचे मार्गदर्शक सुचनेनूसार आणि वन (संवर्धन ) अधिनियम 1980 प्रमाणे ऑनलाईन प्रस्ताव करण्यात आले होते, त्याबद्दल सर्व गोष्टी योग्य असल्याचा रिपोर्ट देण्यात आला होता, त्यासाठी जिल्हाधिकारी यांचे क्र.1 ते क्र. 4 नाहरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी आवश्यक असणार्‍या सर्व पुर्तता केलेली असून इ. सन. 2012 पासून प्रांत अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी मोठा मानसिक त्रास दिला असल्याचे या निवेदनात म्हटले असून या त्रासाला कंटाळून दि. 26 जाने. 2018 रोजी आपले जीवनच नष्ट करणार असून, याची सर्वस्वी जबाबदारी शासनाचीच राहील.
ना हरकत प्रमाणपत्र घेवून देखील प्रशासनाकडून सदर कामासाठी अडवणूक केली जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे.