आईच्या स्मृती प्रित्यर्थ शाळेस दिली आर्थिक मदत
याबद्दल मिळालेली सविस्तर माहिती अशी की ,पारनेर तालुक्यातील वडनेर गावातील रहिवाशी असलेल्या माउली कै.सौ.मंदा मोहन भालेकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या इंदौर ( मध्यप्रदेश )येथे आरोग्य सेविका म्हणुन गेले काही दिवस कार्यरत होत्या.आरोग्य सेवेतुन निवृत्त झाल्या नंतर त्या वड्नेर हवेली या आपल्या गावी राहत होत्या.
त्यांनीही स्वत:च्या जीवनात रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा मानुन सेवा केली.त्यांची हिच सेवावृत्ती लक्षात घेउन उच्च शिक्षित असलेला मुलगा सतीश व मूलगी तृप्ती यांनी आईच्या स्मृती कायम स्मरणात रहाव्या यासाठी आईच्या नावे बँकेत मृत्यूसमयी शिल्लक असणारी 21,000/- रुपये रक्कम वडनेर हवेली येथील जि.प.शाळेसाठी दिली. त्याचप्रमाणे सतीश भालेकर हे जाणीव फौंडेशनच्या माध्यमातून या शाळेतील विदयार्थ्यांसाठी प्रयत्नशील आहेत. नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी असलेले उच्चशिक्षित युवक या जाणीव फौंडेशनच्या माध्यमातुन शाळेतील विदयार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शाळा डिजीटल करत आहे.दशक्रिया विधी निमित्ताने भालेकर परिवाराने घेतलेला हा निर्णय समाजासाठी दिशादर्शक व प्रेरणादायी आहे.
