बेहरामपूर : ग्रंथालय चळवळ लोकप्रिय करण्यासाठी ओडिशातील गंजम जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी विविध शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकांचे वाटप केले. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पुष्पगुच्छ आणि डायरीऐवजी पुस्तके भेट म्हणून देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी प्रेम चंद्र चौधरी यांनी लोकांना केले होते. चळवळीअंतर्गत चौधरी यांनी गत आठवड्यात गोपालपूरमधील एका उच्च माध्यमिक विद्यालयात ओडिया, इंग्रजी आणि हिंदी भाषेतील १२० पुस्तकांचे दान केले. याशिवाय पुरुषोत्तमपूर आणि शेरागाडातील गटविकास अधिकाऱ्यांनी तारिनिपल्ली आणि शेरागाडातील दोन प्राथमिक शाळेत पुस्तकांचे वाटप केले.
जिल्हाधिकाऱ्यांची विद्यार्थ्यांना पुस्तकभेट.
Reviewed by Dainik Lokmanthan
on
13:19
Rating: 5