विद्युत सुरक्षा सप्ताह निमित्त भेंड्यात जनजागृती
भेंडा येथे बसस्थानक चौकात,जिजामाता विद्यालय,सौंदाळा येथील 220 केव्हि व भेंडा 33 केव्ही वीज उपकेंद्र परिसरात विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती केली.विद्युत सुरक्षिततेसाठी काय करावे. व काय करू नये याचे मार्गदर्शन केले.माहितीचे भित्ती पत्रके चिकटविली, माहिती पत्रके वाटण्यात आली.
महावितरणचे उपकार्यकरी अभियंता दिपक आगळे,योगेश रासने, विद्युत निरीक्षक पी.एस.भटवलकर ,श्रीमती सुप्रिया सोमगुतीया,सहाय्यक अभियंता जगन्नाथ बारगळ,शशिकांत निपुंगे,प्राचार्य मालोजीराव भुसारी, उपप्राचार्य सुरेश साबळे, पर्यवेक्षक लक्ष्मण देवढे, आण्णासाहेब काटे,भाऊसाहेब सावंत यांचेसह महावितरणचे कर्मचारी उपस्थित होते.
