निवडणुका करून सत्ता मिळवणे हेच आयुष्याचे ध्येय नसावे: यशवंतराव गडाख
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे माजी खासदार यशवंतराव गडाख यांचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त बालाजी देडगाव येथील अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालयात आयोजीत सर्वपक्षीय सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच बाजीराव मुंगसे होते. तर प्रमुख मान्यवर म्हणून तेलकुडगावचे सरपंच गोरख घोडेचोर, उपसरपंच गोवर्धन काळे, साहेबराव होंडे, माका सेवा संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मन पांढरे, रमेश कराळे, एकनाथ भूजबळ, भाऊसाहेब राजळे, संजय सावंत, मारुती केदार, आण्णा केदार, रावसाहेब गायके, अनिल घुले, सिताराम कारंडे, मल्हारी आखाडे, डॉ.रघुनाथ पगिरे, गोकुळ लोंढे, माजी सरपंच कुंडलिक मुंगसे, कडूभाऊ तांबे, लक्ष्मन बनसोडे, सेवा संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब मुंगसे, नवनिर्वाचित सरपंच चंद्रकांत मुंगसे, दत्ता मुंगसे, उद्धव मुंगसे, पत्रकार बन्सीभाऊ एडके, प्रवीण तिरोडकर, बाळासाहेब उंडे, संतोष तांबे, भारत कोकरे, रामेश्वर गोयकर, गणेश खांडे, शिवाजी थोरात, भास्कर तांबे, भाऊसाहेब सावंत, राजेंद्र गायके, देवस्थानचे सचिव रामानंद मुंगसे, दादा एडके, निलेश कोकरे, संजय मुंगसे, अशोक गर्जे, राजेंद्र ससाणे आदीची प्रमुख उपस्थित होते.
यावेळी माजी खासदार गडाख पुढे म्हणाले झाडाचे पान पिकले की ते गळून पडते. हा निसर्गाचा नियम आहे. त्याप्रमाणे मानवी जीवनाचेही सूत्र आहे. मी उभा केलेला सामाजिक व शैक्षणिक कार्याचा वारसा पुढेही चालू राहावा. राजकारणाबरोबर सामाजिक कार्य करणारी माणसे तयार व्हावीत यामुळे समाजाचा सर्वांगीण विकास होईल. यावेळी बालाजी देडगाव ग्रामपंचायत, देडगाव सेवा संस्था, माजी विद्यार्थी संघ, एकलव्य भिल्ल संघटना, क्रांतिसूर्य लहूजी ग्रुप, बळीराज्य संघटना, बालाजी देवस्थान ट्रस्ट यासह विविध संघटनाच्या वतीने गडाख यांचा सत्कार करण्यात आला.
