राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने जनतेच्या प्रश्नांवर तीव्र आंदोलन उभरावे
वर्षभरानंतर निवडणूका होणार असल्याने कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागावे ,आप -आपसातील गटतट विसरून, कोण मोठा? कोण छोटा? यापेक्षा पक्ष मोठा आहे. याची जाणीव ठेवून काम केलेच तर राष्टवादीची सत्ता येईल. असे सांगतानाच कर्जत तालुक्यात यापुर्वी पक्षाने मंञी पदाचा दर्जा असणारे जि.प.अध्यक्ष पद, उपाध्यक्ष पद, समीती वैगरे देवून तालुक्याला ताकद देवून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी दिली,पक्षाने विचार करून ही पदे दिली होती. त्यामुळे प्रमाणीक व जनतेच्या प्रश्नावर निष्ठा असणाऱ्यांच्या पाठीमागे पक्ष सदैव उभा राहतो.याची जाणीव ठेवून कार्यकर्त्यांनी भाजपा सरकार विरोधात असणा-या नाराजीचा फायदा उठवावा. तसेच भाजपा सरकार महागाई ,बेरोजगारी, जातीय दंगल ,शेतक-याच्या मालाला भाव नाही, जीएसटीने व्यापारी वर्गात तीव्र संताप असल्याने याचा फायदा उठवून राष्ट्रवादी व समविचारी पक्षाच्या हाता सत्ता येण्यासाठी रस्त्यावर उतरून भाजपा सरकार विरोधात संघर्ष करा. व सरकार कसे सर्व गोष्टीत अपयशी ठरले याची जनतेत जावून जागृती करावी व पक्षाची ताकद वाढवण्याबरोबरच जनतेच्या प्रश्नाला न्याय द्यावा.
