नवीन वर्षदिनी दिला आत्मदहनाचा इशारा
कर्जत /प्रतिनिधि/ -कर्जत तालुक्यातील चाँदे बु॥ येथील रहिवाशी अनिल महामुनी , नवनाथ जगताप , रायचंद नवले यांनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कर्जत पंचायत समिती येथे आत्मदहन करण्याचा निवेदनाद्वारे दिला आहे .
प्रधानमंत्री घरकुल योजना 16-17 अंतर्गत आम्हाला सर्वाना घरकुल मंजूर झाले होते . सदर योजनेत आम्ही पात्र झालो होतो. मात्र या यादी मध्ये राजकीय ढवळाढवळ झाल्याने आम्हाला कारस्थान करून डावलण्यात आले , अशा पद्धतीने डावलन्यात आलेले आणखी 15 लोक असून या गैरप्रकाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी अनिल महामुनी , नवनाथ जगताप , रायचंद नवले या तीन ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे . या प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. याकडे लक्ष न दिल्यास दि 1 डिसे 2018 रोजी कर्जत पंचायत समिती येथे आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे