Breaking News

पत्रकारांचा आंदोलनाचा इशारा

पत्रकार अ‍ॅड. हरिहर गर्जे यांच्या विरोधात पाथर्डी येथील पोलीस ठाण्यात दाखल केलेला खंडणीचा खोटा गुन्हा रद्द करावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू, असा इशारा महाराष्ट्र राज्य ग्रामिण पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे यांनी दिला आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी अभिजीत शिवथरे यांना या मागणीचे निवेदन भातकुडगाव ( ता. शेवगाव ) येथे आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष नवगिरे व पत्रकारांनी दिले. निवेदनात म्हंटले आहे, की पाथर्डी येथील पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी खोटी फिर्याद देणा-यांची शहानिशा न करता पत्रकार अ‍ॅड. हरिहर गर्जे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला असून तो तातडीने रद्द करावा. 


खोटी फिर्याद देणारा व कर्तव्यात सूड भावनेने कायद्याचा वापर करणारे पो. नि. चव्हाण यांच्यावर वरिष्ठ पातळीवरून कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष नवगिरे, जिल्हा सचिव अनिल कोळसे, राहूरीचे तालुकाध्यक्ष गोविंद फुणगे, शेवगाव तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, उपाध्यक्ष शंकर मरकड, दिपक खोसे, सोपान जाधव, रामकिसन माने, इसाक शेख, सलीम शेख, रविंद्र मडके, शिवाजी खरड, रामनाथ रुईकर, रामनाथ तांबे आदींच्या सह्या आहेत.