Breaking News

मृत्यूनंतरही जीएसटीतून सुटका नाही : अजित पवार

हिंगोली : भाजप सरकारने मेलेल्या माणसाच्या अंत्यसंस्कारासाठी जीएसटी लावून मृत्यूनंतरही त्यांची जीएसटीतून सुटका केली नाही. म्हणजेच वर जातानाही जीएसटी भरुन जा इतकी सोय या सरकारने आपली करुन ठेवली आहे, अशी टीका विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी हिंगोली येथे झालेल्या जाहीर सभेत केली. लोकशाहीमध्ये हुकुमशाही चालत नाही. 

तिथे बहुमताचा आदर केला जातो. परंतु राज्यकर्ते आज हुकुमशाहीचा वापर करताना दिसत आहेत. यांच्याविरोधात आता साहित्यिक, कलाकार बोलायला लागले आहेत. अण्णा हजारे, यशवंत सिन्हा, माजी खासदार नाना पटोले यांनी एकाधिकारशाहीविरोधात आवाज उठवला आहे. नोटबंदी हे एकाधिकारशाहीचेच मूर्तिमंत उदाहरण असल्याचेही अजित पवार म्हणाले. सरकारच्या दृष्टचक्रात माझा शेतकरी अडकला असताना आम्ही शेतकर्‍यांच्या बाजुने हल्लाबोल विरोधात काढले आहे. मात्र, आमच्याविरोधात खोटेनाटे आरोप करुन गैरसमज पसरवले जात आहेत आणि आम्हालाच सवाल केले जात आहेत. तुम्ही काय केलात शेतकर्‍यांसाठी. अरे आम्ही दिले शेतकर्‍यांसाठी...71 हजार कोटीची कर्जमाफी दिली. हे दिसत नाही का असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी केला.