Breaking News

खेड विद्यालयानजिक गतीरोधक,माहितीफलक बसवा


कुळधरण:प्रतिनिधी :- कर्जत तालुक्यातील खेडच्या लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालयानजिकच्या राज्य महामार्गावर गतीरोधक तसेच माहिती फलक बसविण्याची मागणी होत आहे.खेडपासुन अर्धा किलोमीटर अंतरावर कुमारविश्व शैक्षणिक संकुलात लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालय,परिवर्तन इंटरनॅशनल स्कुल तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयाचा समावेश आहे.या परिसरातील राज्यमार्गावर विद्यार्थ्यांचा सतत वावर असतो.मात्र गतिरोधक नसल्याने भरधाव वेगाने वाहने येतात.अनियंत्रित गतीमुळे अपघाताचा मोठा धोका आहे.रस्त्यालगत शाळा असल्याचा फलक तसेच वेगमर्यादा दर्शविणारा फलक लावण्यात आलेला नाही.येथे माहिती फलक तसेच गतीरोधक बसविण्याची ग्रामस्थांकडुन मागणी होत आहे.

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुका उपाध्यक्ष सतीश मोरे,निलेश आगवण,तुषार महाराज मोरे,सचिन मोरे,किरण मोरे,महेश मोहिते,राम मोरे,आप्पासाहेब मोरे,निलेश देशमुख,अक्षय गायकवाड,महेश मोरे,केतन मोरे,गणेश गायकवाड,काका क्षिरसागर,आबासाहेब मोरे यांनी ही मागणी केली आहे.

विद्यालयाच्या खेड तसेच राशीन बाजुच्या प्रवेशद्वाराजवळ गतीरोधक बसवावे.शाळेजवळ वेगमर्यादा दर्शविणारा तसेच शाळा असल्याचा फलक लावावा.रस्त्यालगतची काटेरी झुडपे हटवावीत अशी मागणी आहे.कर्जतच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे