पद्मावत चित्रपटास विरोध करत रास्ता रोको आंदोलन.
हिंदूकुलभुषण राष्ट्रवीर महाराणा प्रतापसिंह यांच्या राजपूत समाजातील महारानी माता पद्ममावती यांच्या बद्दल पद्ममावत चित्रपटात आक्षेपार्ह चित्रीकरण करून हिंदू धर्माला व राजपूत समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटामध्ये चुकीचा इतिहास दाखविण्यात आला आहे. त्यामुळे हा चित्रपट महाराष्ट्र मध्ये कोणत्याही चित्रपट ग्रूहात प्रदर्शित करू नये. या मागणीसाठी राजपूत समाज महामोर्चा संघचे राज्य अध्यक्ष अजयसिंह ठाकूर यांचे नेत्रुत्वाखाली कर्जत येथे छ.शिवाजी महाराज चौकात नगर बारामती रोडवर सकाळी 11 वाजता रास्तारोको करण्यात आला.
आंदोलन कर्त्यांनी यावेळी विविध घोषणा दिल्या. आंदोलनात यावेळी मा.जी.प.सदस्य राजेंद्र फाळके, नगराध्यक्ष नामदेव राऊत, भाजपाचे तालुकाध्यक्ष अशोकराव खेडकर, सतीश समुद्र, चंदनसिंग परदेशी, बबनसिंग परदेशी, सचिन परदेशी, धरम परदेशी, करण परदेशी, तेजस परदेशी, विजय परदेशी, हेमंत परदेशी, नारायणसिंग परदेशी, गंगासिंग परदेशी, सोमनाथ परदेशी, गणेश शेळके आदीसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी ना. तहसीलदार आल्हाट व पोलिस निरीक्षक वसंत भोये यांना निवेदन देण्यात आले.
