Breaking News

पारनेर तहसिलच्या पटांगणात जप्त केलेल्या वाहनांचा खच.


पारनेर/प्रतिनिधी /-येथील अति महत्वाच्या प्रशासकिय तहसिल कार्यालयाच्या पटांगणात महसुल विभागाने वाळु चोरी करत असताना कारवाई करुन पकडलेले ट्रॅक्टर, ट्रक , जेसीबी , पोकलँड, वाळु यांचा अस्तव्यस्त खच पडलेला दिसुन येत आहे.

पारनेर तहसिलच्या याच पटांगणात 26 जानेवारीचा गणराज्य दिन हा साजरा करण्यात येतो. हा राष्ट्रीय कार्यक्रम असल्याने याचे महत्व वेगळेच आहे. या कार्यक्रमाला शहरातील सेनापती बापट विद्यालयाचे विदयार्थी ,कन्या विद्यालय, जि.प.प्राथमिक शाळेचे मुले, तसेच शहर व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. परंतु या पटांगणात दोन ट्रॅक्टर , दोन ट्रक, जेसीबी , पोकलँड,जप्त केलेली वाळु पटांगणात अस्ताव्यस्त पडलेली आहे. गणराज्य दिन एक दिवसावर आलेला आहे. तरी प्रशासनाकडुन पटांगण स्वच्छ करण्याची कसलीही तयारी केलेली दिसत नाही. लवकरात लवकर पटांगण स्वच्छ करण्याची मागणी जागरुक नागरिक करीत आहेत.