Breaking News

नान्नज गावची सर्वसाधारण ग्रामसभा खेळीमेळीत


जामखेड/ ता.प्रतिनिधी/ - जामखेड तालुक्यातील नान्नज येथे 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात येणारी नान्नज गावची सर्व साधारण ग्रामसभा बुधवार दि. 24 जानेवारी ला सकाळी 11 वाजता खेळीमेळीत पार पडली. यावेळी सर्व नागरिक व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी  डॉ. विद्या मोहळकर ह्या होत्या. 
नान्नज येथे प्रजासत्ताक दिननिमीत्त घेण्यात येणारी ग्रामसभा शासकीय नियोजनानुसार सकाळी ठिक 11 वाजता ग्रामपंचायत कार्यालय नान्नज समोर सर्व खात्याच्या शासकीय अधिकारी, पदाधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक, पोस्ट खाते, बँक कर्मचारी, महावितरण अधिकारी- कर्मचारी, शालेय शिक्षक, व्यवस्थापन कमेटी शाळेचे मुख्यध्यापक इत्यादी सह ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य व गावातील सर्व क्षेत्रातील मान्यवर व्यक्तीच्या उपस्थितीत घेण्यात आली. 

या वेळी गावातील वेगवेगळ्या त्रुटी व शासनाच्या योजना व मागील इतीवृत्त ग्रामविकास अधिकारी रोहीदास कापरे यांनी आपल्या प्रस्ताविकामध्ये सांगितले. जवळका रस्ता येथे स्मशानभुमी दुरूस्ती करणे व वॉल कंपाऊंड बांधणे , मेहेर वस्ती येथे जाण्यासाठी रस्ता व पुल करणे, चौदा वित्त आयोगातील पुर्ण गावातील बंद गटार मार्च पर्यंत बांधकाम करणे, इंदीरनगर रस्ता चार लाख मंजूर, भिमनगर रस्ता तीन लाख मंजूर, अण्णा भाऊ साठे नगर रस्ता सहा लाख मंजूर, जुनी झोपडपट्टी रस्ता दोन लाख मंजूर, चांभार वाडा गटारसाठी एक लाख मंजूर आहे. तसेच प्रधानमंत्री घरकुल आवास योजना व रमाई घरकुल आवास योजना ह्या घरकुलसाठी ज्या लाभार्थी चे नाव असतील त्यांनी कागदपत्र ग्रामपंचायत कार्यालयात आणून देणे व ज्याचे अपुर्ण असतील त्यांनी कागदपत्रे घेऊन यावे. इंदिरा नगर व धनगर वाडा येथे सेवाभवन मंजूरी साठी वर पाठवलेले आहे. गावातील अंगणवाडीला कलर व कंपाऊंड देणार. प्राथमिक शाळा येथे कंपाऊंड व बावी रस्ता चा मुस्लिम समाजाचा ईदगाह आहे येथील अतिक्रमण काढणे. असे ठराव घेण्यात आले आहे. असे नमूद करून ग्रामसभेचा विषय स्पष्ट केला. यावेळी स्वच्छ भारत मिशन, हागणदारी मुक्त गाव, सत्यमेव जयते वॉटर कप 2018, इत्यादी महत्वपूर्ण बाबी वर चर्चात्मक निर्णय घेण्यात आले. त्याचप्रमाणे ऐनवेळी येणाऱ्या नागरिकांच्या सुचना व त्यावर चर्चा ग्रामसभेत करण्यात आली.  या ग्रामसभेत नान्नज ग्रामस्थ व शिवसंग्राम संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अमजद पठाण यांनी मुस्लिम समाजसाठी प्रार्थना स्थळ म्हणजे ईदगाह मैदान या साठी 20 गुंठे जागेची मागणी केली. तसेच ग्रामसभेला संबोधित करण्यास आलेल्या पाणी फाऊंडेशन जामखेड चे समन्वयक संतोष दहिफळे व राहूल ढगे, पशुसंवर्धन चे शेख, कृषी चे गोपाळघरे, सर्व शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. महसूल कृषी व आरोग्य विभागाने हजर राहून आपआपल्या विभागाचे कामा संबधी नागरिकांच्या प्रश्नांचा उलगडा केला.उपस्थितानी दिलेल्या माहितीपर प्रतिक्रिया ने नागरिकांचे समाधान झाले.