कुळधरणला जिजाऊ जयंती उत्साहात
चांदे बुद्रूक येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक बापुराव वावगे यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. अशोक नेवसे, गोरख धस यांनी सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट उलगडून दाखवला. साक्षी शिर्के, अक्षदा मुळे, तुषार शिर्के या विद्यार्थ्यांची भाषणे झाली. जामदारवाडी जिल्हा परिषद शाळेत प्रमोद शिंदे यांनी प्रतिमा पूजन केले. विद्यार्थ्यांनी जिजाऊंच्या वेशभूषेसह सादर केलेल्या नाटकाने उपस्थित प्रेक्षक भारावुन गेले. जिजाऊंच्या कार्यावर आधारित सादर झालेल्या नाटकाला पालकांनी चांगलीच दाद दिली. प्राजक्ता शिंदे हिने जिजाऊंची भुमिका केली. ओंकार सुळ याने छत्रपती शिवाजी महाराज भुमिका बजावली. वैष्णवी शिंदे हिने सईबाईची भूमिका बजावली. अथर्व खोडवे, संतोष लोखंडे, उमेश मत्रे, अभिनय लोखंडे, धनसाई सूर्यवंशी, आदित्य मत्रे, सार्थक शिंदे हे मावळे बनले होते.उद्धव थोरात यांनी सुत्रसंचालन करुन आभार मानले.
