बुडणार्या आठ जणांचे प्राण वाचविणार्या युवकांना गुरु गोविंदसिंग शौर्य पुरस्कार प्रदान
अहमदनगर / प्रतिनिधी । शीख समाजाचे दहावे गुरू गोविंदसिंगजी यांच्या जयंती निमित्त हरनामसिंग वधवा यांच्या स्मरणार्थ वधवा परिवाराच्या वतीने देण्यात येणारा गुरु गोविंदसिंग शौर्य पुरस्कार बुडणार्या आठ जणांचे प्राण वाचविणारे विलास माने, संतोष लोंढे, देवेंद्र बेरड व मनोज गाडळकर यांना गुरुनानक देवजी यांचे वंशज बाबा सुखदिपसिंग बेदी यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी देवेंद्रसिंग वधवा, महेंद्रसिंग वधवा, मोहनसिंग वधवा, मनिष कौर, गुरुद्वाराचे अध्यक्ष गुरुद्यालसिंग वाही, गुलशन धुप्पड, हरजितसिंग वधवा, जसमितसिंग वधवा, सनी वधवा, डॉ. सिमरन वधवा, अमरजितसिंग वधवा, मनप्रितसिंग वधवा आदिंसह शिख, पंजाबी व सिंधी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एमआयडीसी येथील साईबन या खाजगी पर्यटनस्थळी फिरण्यासाठी आलेल्या दोन कुटुंबातील सदस्य बोटिंग करत असताना त्यांची बोट उलटून त्यामधील आठ जण बुडत असताना, वरील चारही युवकांनी आपल्या प्राणाची बाजी लावून त्यांना वाचविले याबद्दल त्यांना यावर्षीचा गुरु गोविंदसिंग शौर्य पुरस्कार देण्यात येत असल्याचे हरजितसिंग वधवा यांनी स्पष्ट केले. स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र व पाच हजार शंभर रुपये या पुरस्काराचे स्वरुप आहे.