Breaking News

सोशल मिडियाचा अध्यापनात सकारात्मक वापर करा: आशिष बोरा

कुळधरण/प्रतिनिधी/- शिक्षकांनी दैनंदिन अध्यापनात सोशल मिडियासह इतर तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करावा.समाजाच्या शिक्षकांकडुन खुप अपेक्षा असतात.त्यासाठी शिक्षकांना वेगळेपण जपत अध्यापन करावे व स्वतःतील कौशल्यांचा विकास करावा असे प्रतिपादन पत्रकार आशिष बोरा यांनी केले.

कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांसाठी स्पोकन इंग्लिश प्रशिक्षणाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते.कर्जत येथे १ ते ५ जानेवारी या कालावधीत या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.तालुक्यातील विविध प्राथमिक शाळांतील चाळीस शिक्षकांनी प्रशिक्षणात सहभाग घेतला.

यावेळी प्रशिक्षण वर्गातील तज्ञ मार्गदर्शक प्रा.किरण जगताप,प्रा.प्रमोद तोरडमल, लोकमंथनचे तालुका प्रतिनिधी सुभाष माळवे,समन्वयक ज्ञानेश्वर गाडेकर उपस्थित होते.यावेळी अशोक नेवसे यांनी विचार मांडले.नितीन घालमे यांनी आभार मानले.

या प्रशिक्षणात शिक्षकांच्या कृतीयुक्त सहभागातुन विविध भाषिक कौशल्ये विकसित करण्यात आली.श्रवण कौशल्ये,बोलण्यातील आत्मविश्वास,प्रश्न कौशल्ये,अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर,सादरीकरण आदी मुद्यांवर आधारित प्रशिक्षण देण्यात आले.प्रशिक्षणार्थीनी इंग्रजीतील विविध विषयावर नाट्य,संवाद सादर केले.गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक ज्ञानेश्वर गाडेकर,शाहु फाळके,साधनव्यक्ती चंद्रकांत दळवी,सुनील सांगळे यांनी आयोजनात सक्रिय सहभाग घेतला