Breaking News

माहिती अधिकार प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न


अहमदनगर दि. ११ - महाराष्ट्र शासनाचे सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग व यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी ( यशदा), पुणे यांचे संयुक्त विद्यमाने माहितीचा अधिकार अधिनियम २००५ बाबतचे एक दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रम काल जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सभागृहात संपन्न झाले. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेच्या वतीने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षणामध्ये माहिती अधिकार कायदयाचा इतिहास, स्वरुप, उद्दिष्टे, व्याप्ती व कायद्यातील महत्वाच्या संकल्पना तसेच समुचित शासन व सार्वजनिक प्राधिकारणाच्या जबाबदा-या या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले अशी माहिती जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांनी दिली.

यावेळी प्रशिक्षण व्याख्याते विठ्ठल बुलबुले, जयंत गायकवाड व नितिन राऊत यांनी तीन सत्रामध्ये प्रशिक्षण दिले.माहिती अधिकार अधिनियम 2005 या कायद्याच्या अनुषंगाने अंमलबजावणी करण्यामध्ये येणा-या अडीअडचणीबाबत चर्चा करुन त्याबाबत उपस्थित प्रश्नार्थीचे व्याख्यात्यांनी समाधान केले. या प्रशिक्षणासाठी जिल्हयातील 76 अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी दाबशेडे यांनी या कार्यशाळेचे महत्व व माहितीचा अधिकार अधिनियम 2005 ची अंमलबजावणीसाठी अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्याची गरज यावेळी स्पष्ट केली.