ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम पालकमंत्र्यांच्या हस्ते
ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम पोलीस मुख्यालय मैदानावर होणार आहे. हा कार्यक्रम सकाळी सव्वानऊ वाजता होणार असल्याने जास्तीत जास्त व्यक्तींना या मुख्य शासकीय समारंभात सहभागी होता यावे, यासाठी या दिवशी सकाळी 8-30 ते सकाळी 10 वाजेच्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अशासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत. सदर कार्यक्रम सकाळी 8-30 पूर्वी किंवा सकाळी 10 वाजेनंतर आयोजित करण्यात यावेत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
प्रजासत्ताक दिनी शालेय मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, मुख्य संचलनामध्ये पोलीस, गृहरक्षक दल, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, स्काऊट आणि गाईड आदींचे संचलन होणार असून विविध शासकीय योजनांची माहिती देणारे चित्ररथही यात सहभागी होणार आहेत. याबाबत, संबंधित सर्व यंत्रणांनी त्यांना दिलेली जबाबदारी बिनचूक पार पाडण्याचे निर्देश त्यांनी दिले.
