Breaking News

ममतांच्या 'डी-लिट' पदवीविरोधात याचिका.


कोलकाता : कोलकाता विद्यापीठाकडून ११ जानेवारी रोजी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांना मानद डी-लिट पदवी देण्याच्या निर्णयाविरोधात कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे. कोलकाता विद्यापीठाच्या सिनेटवर सदस्यांची नियुक्ती राज्य सरकारकडून केली जाते. त्यामुळे ममतांना दिल्या जाणाऱ्या 'डी-लिट'वर याचिकेतून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत.