Breaking News

शुभम गोडळेकर विद्यापिठ संघात

अहमदनगर - नुकत्याच पुणे येथे पार पडलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ अंतर्गत आंतरविभागीय तलवारबाजी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याने महाविद्यालयाचा खेळाडू शुभम गोडळेकर याची दि. 17 ते 19 जाने. 2018 दरम्यान गुरूनानक देव विद्यापीठ, अमृतसर येथे होणार्‍या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तलवारबाजी संघामध्ये निवड करण्यात आली आहे. 


अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे अध्यक्ष माधव मुळे, उपाध्यक्ष नंदकुमार झावरे, जी. डी. खानदेशे, दिपलक्ष्मी म्हसे आदिंनी शुभमचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. शुभमला प्रा. सुनिल जाधव, होणाजी गोडळकर यांचे मार्गदर्शन मिळाले.