विद्यार्थी प्रतिनिधी निवडणुकीत दोन पक्षांमध्ये खडाजंगी
मागील आठवड्यामध्ये सावित्रीबाई पुणे विद्यापिठामार्फत महाविद्यालयास विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक घेण्याबाबत पत्र मिळाले होते, तेंव्हापासून महाविद्यालयामध्ये निवडणूकीचे वारे वाहत होते. मागील शैक्षणिक वर्षामध्ये निवडणूका या लोकशाही पद्धतीने पार पाडल्या जाव्यात असा आदेश विद्यापिठामार्फत देण्यात आला होता.
या निवडणूकांमध्ये कोणत्याही राजकीय हस्तक्षेप होणार नाही याची काळजी घेण्याची तरतुद करण्यात आली होती, परंतु महाविद्यालयांमध्ये होणार्या निवडणूकांमध्ये राजकीय पक्ष आणि विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी याठिकाणी आपली उपस्थिती दर्शविली होती, निवडणूकीची सुरूवात शांततापूर्ण वातावरणात पार पडली, परंतु विद्यार्थी प्रतिनिधी निवडीनंतरच दोन राजकीय गटांच्या प्रतिनिधींमध्ये प्रतिनिधी निवडीच्या श्रेयवादावरून मदभेद झाले. त्यावरूनच वाद आणखी चिघळला आणि विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूकीने महाविद्यालयीन वातावरण गढूळ करण्यात आले.
