Breaking News

सरकारी कामात अडथळा प्रकरणी राष्ट्रवादीच्या युवा नेता अटकेत


पारनेर/प्रतिनिधी /- तालुक्यातील चिंचोली गावच्या सरपंच पती राष्ट्रवादीचे युवा नेते सतिष पिपरकर याला फीर्यादी गटविकास अधिकारी विशाल गुलाब तनपुरे यांनी पंचायत समिती मासिक मिटींग चालु असताना निघोज पंचायत समिती गणाचे दिनेश मुरलीधर बाबर यांना मोबाईल वरून धमकी देण्यात आली होती. 
त्या प्रकरणी पिंपरकर च्या विरोधात दि 11 जानेवारी रोजी राञी 11.33 वाजता 353 चा गुन्हा दाखल करण्यात आला. १२ जानेवारी च्या सकाळी 12.19 वाजता पारनेर पोलीसा कडुन अटक करण्यात आली. तालुक्यातील निघोज गणाचे कॉग्रेसचे पंचायत समितीचे दिनेश बाबर यांना गुरुवारी दु.2.42 वाजता मोबाईल वरुन जीवे मारण्याची धमकी दिली होती. या संबधीची तक्रार पारनेर पोलीस ठाण्यात स्वत: दिनेश बाबर यांनी दिली होती. पारनेर पंचायत समितीत कॉग्रेस व राष्ट्रवादी सत्तासंघर्ष उफाळला असुन तो पारनेर पोलीस ठाण्यापर्यंत पोहचला. तर गुरुवारी आयोजीत पंचायत समिती मधील मासिक सभा तातडीने तहकुब करण्यात आली.असल्याचे पञ गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी पोलीस प्रशासनास दिले आहे. 

यासंबधी अधिकची माहीती अशी की, गुरुवारी पारनेर पंचायत समितीची मासिक बैठक असल्याने पारनेर पंचायत समितीच्या सभागृहात सभापती राहुल झावरे,उपसभापती दिपक पवार व गटविकास अधिकारी विशाल तनपुरे आदिंच्या उपस्थितीत बैठकित रोजगार हमी योजना, वैयक्तीक विहीर, 14 वित्त आयोग , दलित वस्ती योजना यावर चर्चा चालु होती. यावेळी दिनेश बाबर यानी रोजगार हमी योजनांची माहीती संबधित अधिका-यांना मागीतली.परंतु चारही अधिकारी यांची वेगवेगळी उत्तरे आल्याने संबधित कागदपञे त्या कर्मचाऱ्याला आणण्यासाठी बाहेर पाठवण्यात आले. त्याच दरम्यान मो.7798399214 या क्रमांकावरुन आमच्या गावातील रोजगार हमी योजनेची माहीती मागण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे. आमचे गाव तुमच्या गावात येत नसुन तुम्हाला पारनेरला परत जायचे आहे का? घाटाखाली या पाहुन घेतो. असे म्हणुन दमबाजी केल्याचा आरोप सदस्य दिनेश बाबर यांनी केला आहे.या बैठकीत किवा चिंचोली गावच्या प्रश्नाबाबत किवा चौकशी बाबत बोललो नसताना ही दमबाजी का? सहन करु असा सवाल दिनेश बाबर यांनी केला आहे. या अगोदरही सतिष पिंपरकर याने दमबाजी केल्याचे सांगीतले आहे. त्यामुळे सध्या कॉग्रेस व राष्ट्रवादीत कलगीतुरा पहावयास मिळत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पो.नि.पवार करीत आहेत.