Breaking News

जिजामाता विद्यालयात विद्युत सुरक्षा सप्ताह


भेंडा/प्रतिनिधी/- येथील श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे जिजामाता माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात वीज महावितरण कंपनीच्या वतीने विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला.

या निमित्ताने विद्यार्थ्यांना सुरक्षित वीज वापर, विद्युत उपकरणे, वीज बचत, धोके, अपघात, सुरक्षा या विषयी माहिती देण्यात आली. महावितरणचे विद्युत निरीक्षक प्रशांत भटवलकर, उप कार्यकारी अभियंता दीपक आगळे, विद्युत निरीक्षक सुप्रिया सोमगुतिया, सहाय्यक अभियंता जगन्नाथ बारगळ, कार्यकारी अभियंता योगेश रासने शशिकांत निपुंगे यांनी मार्गदर्शन केले. भाऊसाहेब सावंत यांनी आभार मानले.

कार्यक्रमास उपप्राचार्य सुरेश साबळे, पर्यवेक्षक लक्ष्मण देवढे, आण्णासाहेब काटे, महावितरणचे कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते