Breaking News

दोन्ही कलाकारांना कोणी घडवल नसून भगवंतानी पाठविलेली माणसं: बाबासाहेब सौदागर


शेवगाव /प्रतिनिधी /- “घार हिंडे आकाशी तिचे चित्त पिल्लापाशी” या उक्तीप्रमाणे कलाकार मंडळी राज्यभर विविध कार्यक्रमात आपल्या गावाच नावलौकिक करण्याचा प्रयत्न करत असतात.शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथील ह.भ.प.शिवशाहीर कल्याण काळे, भारुडकार हमीद सय्यद ही दोन्ही कलाकारांना कोणी घडवल नसून भगवंतानी पाठविलेली मानस आहेत. अशा व्यक्तींना दैवी शक्ती असल्याने त्यांनी महाराष्ट्रात वेगळा ठसा उमटवून शिवछत्रपतीचा इतिहास जनतेपुढे आणण्याचे काम केले.त्याची दखल घेत अखिल भारतीय मराठा सेवा संघाने सन-२०१७/१८ चा राज्यस्तरीय मराठा भूषण पुरस्कार देवून गौरविण्यात आले. असल्याचे मत प्रसिद्ध चित्रपट गीतकार बाबासाहेब सौदागर यांनी व्यक्त केले.
ह.भ.प. शिवशाहीर कल्याण काळे यांना शुक्रवार (दि.१२) भातकुडगाव (ता.शेवगाव) येथे हनुमान मंदिराच्या प्रांगणात राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्यसाधून अखिल भारतीय मराठा सेवा संघाचा सन-२०१७/१८ चा राज्यस्तरीय मराठा भूषण पुरस्कार बाबासाहेब सौदागर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुभाष जावळे होते.

सौदागर पुढे म्हणाले की, जीवनामध्ये गद्य,पद्य,मद्याची नशा करावी लागते. आम्ही गद्य, पद्याची नशा करून शब्दाची पूजा करतो. शब्दाचा शोध घेवून एक खजिना निर्माण केला आहे. पुरस्कारकर्ते लाचार नाहीत. त्याची गरुडासारखी जात आहे. ते कितीही भरारी घेवो परंतु मातीला विसरत नाहीत.यावेळी अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे राज्य कार्याध्यक्ष डॉ.कृषिराज टकले, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पटारे, कविता सौदागर, सुभाष गागरे, यांची भाषणे झाली. काळे महाराज यांचा विविध संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

पुरस्कार वितरण सोहळ्यास प्रसिद्ध भारुडकार हमीद सय्यद, रमेश महाराज जाधव, संतोष महाराज पवार, दत्तात्रय तोरडमल, राम घुमरे, ईश्वर वाघमारे, राजेश फटांगरे, विठ्ठल फटांगरे, सरपंच सर्जेराव नजन माजी उपसरपंच शंकर नारळकर, संभाजी आहेर, भाऊसाहेब मनाळ, भास्कर शिंदे, राजेंद्र लोमटे, गोविंद जमधडे, पांडुरंग आहेर,यांच्यासह विविध संस्थेचे पदाधिकारी,ग्रामस्थ मोठ्या सख्खेने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक संयोजक समितीचे अध्यक्ष मुकुंद जमधडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रदिप टाके तानी केले तर आभार पांडुरंग गायकवाड यांनी मानले.