Breaking News

कोपर्डीत प्रजासत्ताकदिनापासून भरणार शेळी- मेंढी बाजार


कुळधरण /प्रतिनिधी :- कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे आता दर शुक्रवारी शेळी-मेंढी बाजार भरणार असल्याची माहिती सरपंच रोहिणीताई सुद्रिक यांनी दिली. तालुक्यात अधिक प्रमाणावर शेळी-मेंढीचे उत्पादन होत असलेल्या भोसे, रूईगव्हाण, शिंदे आदी गावातील उत्पादकांची यामुळे सोय होणार आहे. ग्रामपंचायतने गावठाणातील पाच एकर जागा बाजारासाठी उपलब्ध करुन दिली आहे.या बाजारात शेतकर्‍यांनी शेळी, मेंढी, बोकड विक्रीसाठी आणावेत असे आवाहन सुर्यभान सुद्रिक तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे.