Breaking News

गरजू विद्यार्थ्यांना बुट-सॉक्सचे वाटप


जामखेड /ता. प्रतिनिधी । 25 ःसमाजहिताची जाण ठेवणारे शिवसेना युवा नेते लक्ष्मण कानाडे यांच्या वतीने तालुक्यातील रत्नापुर जि. प. प्राथमिक शाळेच्या पहिलीतील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला बुट व सॉक्सचे वाटप करण्यात आले, सरसेनापती कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या बाण्यातील करारीपणा आणि रोकठोक भुमिका व अन्यायाचा प्रतिकार करून समाजापुढे आक्रमक भूमिका मांडणारी शिवसेना आजही महाराष्ट्रात जपत असताना दिसतात, याच पार्श्‍वभूमीवर जामखेड तालुक्यातील गरडाचे पाटोदा येथील परंतु हल्ली व्यवसायासाठी मुंबई येथे असणारेे शिवसेना नेते लक्ष्मण कानाडे यांच्या माध्यमातून व रत्नापुर ग्रामपंचायत सदस्य गोरख राजगुरू यांच्या प्रयत्नातून जामखेड तालुक्यातील रत्नापुर जि. प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना बुट सॉक्सचे वाटप करण्यात आले, यावेळी ग्रा.सदस्य राजगुरू, मुख्यध्यापक खवळे, शिक्षकांसह विद्यार्थी उपस्थित होते, समाजातील उपेक्षित घटकांसाठी तसेच त्यांच्या न्याय व हक्कासाठी जामखेड तालुक्यातील शिवसेना नेते लक्ष्मण कानाडेंच्या माध्यमातून प्रयत्नशील राहून, रस्त्यावर उतरण्याची वेळ आल्यास सेना मागे हटनार नसून, समाजहिताचे कार्यक्रम जामखेड तालुक्यात लक्ष्मणराव कानाडे यांच्या माध्यमातून शिवसेना राबविणार असल्याचे जामखेड तालुका शिवसेना प्रमुख संजय काशीद यांनी दै. लोकमंथनशी बोलताना सांगितले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्यध्यापक खवळे यांनी तर आभार नवसरे यांनी मानले.