सोनई-सोनई येथील श्री वेयकेटेश पतसंस्था त ठेवीदारांचे लाखों ठेवी मुदतीनंतर मिळत नसल्याने ठेवीदारांनी पथसंस्थेच्या दरात आमरण उपोषण सुरु केले आहे.याबाबत माहिती की ठेवीदारांनी पथसंस्थेतील ठेवीची रकम मुदतीनंतर एक वर्ष या नंतर वारंवार मागणी करून संस्थेचे अध्यक्ष सुनिल बंग ठेवीदारांचे रकम परत देण्यास टाळाटाळ करून वेळ कडू पनाचे धोरण घेत आहे. यामध्ये महिला व गोर गरिब ठेवीदार असल्याने याची कुठलीही गंभीर दखल घेतली नाही या बाबत संबंधित मुख्यमंत्री , सहकार मंत्री,जिल्हा निबंधक व तालुका निबंधक यांच्या कडे तक्रार करून ही दखल न घेतल्याने आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक ठेवीदारांनी पदाधिकारी च्या मालमत्ता ताब्यात घेऊन ठेवीदारांचे ठेवीचे पैसे परत करावे मात्र , अध्यक्ष सुनील बंग व व्हा.चेरमान अभय चेंगेडिया यांना मात्र या संदर्भात कोणते ही उत्तर देतया आले नाही .यासंदर्भात लवकरच गुन्हे दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपोषण करत्याची शासकीय अधिकारी श्री खेडेकर यांनी भेट घेऊन तपासणी अंती कारवाई चालू असल्याचे आश्वासन देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. या उपोषणस व्यापारी असोसिएशनचे शिवाशेठ बाफना यांनी पाठिंबा दिला. यामध्ये अजित बडे ,संजय खंडागळे ,संजय भळगाठ अभय भळगाठ, रमेश तेलोर,मकरंद जोगदे, सुरेखा पालवे, सौ. कुलकर्णी सुभाष लुनिया , प्रवीण चेंगेडिया, अशोक हलाल यांच्यासह अनेक सभासद ,ठेवीदार उपोषनस बसलेले आहे.
ठेवीदारांचे पैसे मिळत नसल्याने पतसंस्था समोर ठेवीदारांचे उपोषण
Reviewed by Dainik Lokmanthan
on
10:08
Rating: 5