शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शनाचे आयोजन
रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटी तर्फे शेवगाव येथे दि. 24 ते 26 जानेवारी 2018 या कालावधीत शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्व. मारूतराव घुले मंगल कार्यालयात हे शस्त्र प्रदर्शन आयोजित केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रेरणादायी शौर्याच्या इतिहासातून आजच्या पिढीला स्फुर्ती व प्रेरणा मिळावी हा या प्रदर्शनाचा उद्देश असल्याचे रोटरी क्लबचे अध्यक्ष भागनाथ काटे व डॉ. गणेश चेके यांनी सांगीतले.
प्रदर्शनाच्या नियोजनासाठी रोटरी क्लबच्या पदाधिका-यांची बैठक सोमवारी पार पडली. तालुक्यातील विविध शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, युवा पिढी व नागरिकांना नाममात्र शुल्कामध्ये विविध शिवकालीन शस्त्रास्त्रे पाहण्याची संधी मिळणार आहे. तालुक्यातील विविध शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना यांनी विद्यार्थ्यांना, युवा पिढीला व नागरिकांना हे शस्त्र प्रदर्शन पाहण्यासाठी प्रोत्साहीत करण्याचे आवाहन रोटरीचे अध्यक्ष भागनाथ काटे, डॉ. गणेश चेके, प्रा. दिलीप फलके, डॉ. आशिष लाहोटी, प्रा. किसन माने, डॉ. पुरूषोत्तम बिहाणी आदींसह पदाधिकार्यांनी केले आहे.
