नागपूर/प्रतिनिधी - पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात पसरलेल्या नक्षल चळवळीचा बिमोड करण्यात पोलिसांना बर्यापैकी यश प्राप्त झाले आहे. गेल्या 2017 मध्ये पोलिसांनी तब्बल 19 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले असून 67 नक्षलवादी आणि समर्थकांना अटक केली आहे. तर 22 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यामुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षभरात एकूण 19 नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश मिळाले. यामध्ये 3 पोलिस शहीद झाले.
नक्षल चळवळीचा बिमोड करण्यात यश
Reviewed by Dainik Lokmanthan
on
07:37
Rating: 5