पदवीधर प्राथमिक शिक्षक महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा
सर्व साधारण व अवघड क्षेत्रात दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी पदवीधर प्राथमिक शिक्षक महासंघाच्या वतीने जि. प. अध्यक्षा शालिनी विखे, उपाध्यक्षा राजश्री घुले, मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने, प्राथमिक शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांना निवेदन देण्यात आले. सर्व्हेक्षण करताना अवघड क्षेत्रासाठी निकषास पात्र असलेल्या शाळांचा अवघड क्षेत्रात समावेश करण्यासाठी महासंघाचे राज्य सरचिटणीस महेश डोईफोडे यांनी अधिकारी व पदाधिकार्यांशी चर्चा केली. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रीया राबविताना जि. प. प्रशासनाने शासनाच्या बदली आदेशानुसार जिल्ह्यातील शाळांची सर्व साधारण व अवघड क्षेत्रात विभागणी केली आहे. शासनाच्या धोरणानुसार अवघड क्षेत्रातील शिक्षकांना बदलीमध्ये प्राधान्यक्रम देण्यात आला आहे. परंतु अवघड क्षेत्रातील शाळा निश्चित करताना अनेक त्रुटी राहिलेल्या आहेत.
काही शाळा दुर्गम डोंगराळ भागातील असून, तालुक्यापासून दूर अंतरावर आहे. अवघड क्षेत्रासाठी असणारे सर्व निकषास पात्र असूनही त्यांचा समावेश सर्वसाधारण क्षेत्रात करण्यात आला आहे. सर्व्हेक्षण करताना ज्या शाळा अवघड क्षेत्रात घेण्यासाठी योग्य असा शेरा असतानाही त्यांचा समावेश सर्व साधारण क्षेत्रात करण्यात आल्याचे निवेदनात म्हंटले आहे. ज्या शाळा अवघड क्षेत्रासाठीच्या निकषास पात्र आहेत. त्यांचा अवघड क्षेत्रात समावेश करण्याची मागणी प्राथमिक शिक्षक महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. या प्रश्नावर ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता यांची भेट घेणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करुन, न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याची भुमिका घेणार असल्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला.
यावेळी जिल्हा संघटक संदीप हिरवे, कोषाध्यक्ष बाळासाहेब दातीर, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष संजय रामफळे, दिलीप शिंदे, सखाहरी दाते, भीमराव पाखरे, अनिल हंडोरे, जालिंदर भिसे, रामप्रसाद आव्हाड, आण्णासाहेब साळुंके, पोपट पवार, नवनाथ वाळके, राजू नरवडे, कैलास दातीर, विजेंद्र साबळे, पंकज पैठणकर, संजय भांगरे, भानुदास गाडेकर, गिरीश गायकवाड, नामदेव भिटे, भास्कर वाघचौरे, तुषार केदार, बिंदुकुमार नरड, गोरख वाघचौरे, अमोल ससाणे, बाळासाहेब गोडसे, हरिबा चौधरी, मच्छिंद्र लोखंडे आदिंसह जिल्ह्यातील शिक्षक उपस्थित होते.