सुधारीत पाणीपुरवठा योजना राबविणार - पालकमंत्री शिंदे
जामखेड / ता. प्रतिनिधी - शहराला पाणीपुरवठा करणारा भुतवडा लिंक भरून वाहत असताना चार दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे, ही बाब निश्चितच चांगली नाही. यादृष्टीने व वाड्या वस्त्यांसाठी सुधारीत आराखडा तयार केला आहे. लवकरच ही योजना राबवून शहराला स्वच्छ व दररोज पाणीसाठा करण्याचे आश्वासन पालकमंत्री राम शिंदे यांनी दिले.
शहरातील अमित चिंतामणी यांच्या प्रभाग क्रमांक 13 मधील मोगलपुरा, जुनी स्टेट बँक परीसर, जाधव गल्ली तसेच संताजी नगर, सदाफुले वस्ती, निमोणकर वस्ती येथे सिमेंट रस्ता भूमीपूजन जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री तथा पालक मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष अर्चना राळेभात, उपनगराध्यक्ष महेश निमोणकर, नगरसेवीका वैशाली झेंडे, नगरसेवक अमित चिंतामणी, पणन संचालक डॉ. ज्ञानेश्वर झेंडे, शहराध्यक्ष सोमनाथ राळेभात, मझहर शेख, जाकीर पठाण, अजलान शेख, मझहर खान, बब्बु पठाण , कीशोर जाधव, शाम जाधव, रवी जाधव, उमेश देशमुख, पोतदार गुरुजी, गणपत वायभट, सुरेश रेळेकर, संपत जाधव, संजय गुंदेचा, बबलु देशमुख, दत्ता देशमुखसह कार्यकर्ते उपस्थित होते.
अमित चिंतामणी यांच्या प्रभाग क्रमांक 13 मधिल जाधव गल्ली येथे 10 लाख 87 हजार, मोगलपुरा येथे 10 लाख 85 हजार व जुन्या स्टेट बँक परीसरात 9 ला 97 हजार रुपयांचा नीधी उपलब्ध असुन या मध्ये पेव्हिंग ब्लॉक, सिमेंट रस्ता व सांडपाणी व्यवस्था अशी कामे करण्यात येणार आहेत. नववर्षांच्या सुरवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराच्या विकासासाठी 25 कोट रूपयांचा आराखडयाला मंजुरी दिली आहे. तो निधी लवकरच मिळेल. त्यामुळे विकासाचे चित्र बदलेल. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आजच साडेतीन कोटी विकासकामाचे भूमिपूजन केले आहे. यापुढील काळात विकासकामासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले.