रेमंडशॉप ; इवंती दालन शहराच्या वैभवात भर ः आ. जगताप.
जामखेड :- आजची स्पर्धा ही वाढती स्पर्धा आहे, या स्पर्धेत टिकून राहतो तोच यशस्वी होतो. ग्रामिण भागात देखील रेमंडशॉप व इवंती साडी दालन सुरू झाल्याने ग्राहकांना जिल्ह्याच्या ठिकाणी खरेदीसाठी जाण्याची गरज पडणार नाही. तसचे हे शॉप जामखेडच्या वैभवात भर घालण्याचे काम नक्कीच करेल असे मत आ. अरुण जगताप यांनी व्यक्त केले.
शहरात बीडरोड येथे नुकत्याच झालेल्या रेमंडशॉप, इवंती साडी दालनास आ. अरुण जगताप यांनी भेट दिली, यावेळी ते बोलत होते. यावेळी जि. प. सदस्य अॅड. सचिन जगताप, डायरेक्टर निहार भरणे, रुबीन डीसोजा, मॅनेजर माधव कउटकर, जि. प. सदस्य शहाजी राळेभात, संभाजी राळेभात, डॉ. भगवान मुरूमकर, मा. सरपंच हनुमंत पाटील, गणेश डोके, प्रा. लक्ष्मण ढेपे, डॉ. चंद्रशेखर नरसाळे, भैय्या गोंदकर, संजय डोके, अशोक यादवसह अनेक मान्यवर उपस्थित होते.रेमंडशॉप व इवंती साडी दालनास भेट दिल्यानंतर त्यांनी डायरेक्टर व मॅनेजर यांचे कौतुक करुन ग्रामीण भागात दालन उभा करुन ग्राहकांची सेवा करण्याचा माणस केल्याने आभार मानले.
