जिल्हा उपाध्यक्ष पदावर अरुण सोनकरची निवड
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष नानासाहेब जवरे यांच्या सुचनेनुसार आरोटे यांनी अरुण सोनकर यांची निवड केली आहे. पत्रकार संघाच्या अकोले येथील कार्यालयात राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच् बैठक संपन्न झाली. त्यामध्ये जिल्ह्यातील पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. सोनकर हे चांदा येथील पत्रकार असून गेली २० वर्षापासून त्यांनी पत्रकारीतेत आपला वेगळा ठसा उमटवला आहे जनतेच्या विविध प्रश्नांवर निपक्ष व सडेतोड लिखाणातुन त्यांनी अनेक प्रश्नांचा पाठपुरावा केला आहे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातही त्यांनी संघटनात्मक काम केले. याची दखल घेत राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी त्यांना पदावर काम करण्याची संधी दिली आहे जिल्ह्यातील पत्रकाराच्या संघटनात्मक कार्यासाठी आपण काम करणार असल्याच सोनकर यांनी सांगितले.
