सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त भव्य रांगोळी स्पर्धा
चांदा येथील जि.प.प्रा.शाळा ,ग्रा.कार्यालय व जवाहर विद्यालय येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली . प्रथम सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या वेळी गावातील राजकीय , सामाजिक व अनेक मान्यवर ,ग्रामस्त उपस्थित होते.जिल्हा परिषद प्रा.शाळा चांदा येथे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले ,यावेळी मुख्याध्यापक इंगळे , उषा मोरे , वर्षा शिंदे , रुपाली खेडकर , अंजली जाधव यांनी सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शाळा सुरु करण्यासाठी किती त्रास सहन केला. स्री शिक्षणाच्या प्रनेत्या, विद्देची जननी, समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या अशा थोर क्रांतिकारी सावित्रीबाई विषयी उपस्थित विद्यार्थ्यांनी आठवणीना उजाळा दिला. संतूर साबण कंपनीच्या वतीने घेण्यात आलेल्या भव्य रांगोळी स्पर्धा परीक्षण केले.
यामध्ये १०६ महिला / मुलीनी सहभाग घेऊन आकर्षक, कलात्मक मोठ मोठ्या रांगोळ्या काढल्या होत्या स्पर्धेसाठी संतूर साबण कंपनीतर्फे पंकज काळे .असिफ शेख यांनी आकर्षक बक्षिसाचे नियोजन केले स्पर्धेत प्रथम अंजली अनिल तुपे , द्वितीय रुपाली विठ्ठल खेडकर ,तृतीय शारदा विठ्ठल दहातोंडे यांना मोठी गृह उपयोगी बक्षिसे मिळाली . तसेच उर्वरित स्पर्धकांना देखील कंपनीचे आकर्षित बक्षिसे देण्यात आली.या रांगोळ्या जवाहर विद्यालयाच्या प्रांगणात व जि.प.प्रा.शाळेच्या प्रांगणात काढण्यात आल्या होत्या . व्यापारी गौरव कटारिया प्राचार्य चंद्रकांत दरंदले, मुख्याध्यापक इंगळे यांचे विशेष सहकार्य लाभले . कार्यक्रमास का.पो.पाटील कैलास अभिनव ,ग्रा.प.सदस्य शहाजी धुमाळ .थिगळे , मते, दहातोंडे ,आदी शिक्षक ,महिला ,भगिनी ,विद्यार्थी उपस्थित होते.तसेच जवाहर विद्यालयातही सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली . श्रीमती.शेरकर ,ह.भ.प.आडभाई महाराज ,बाळासाहेब जावळे ,रावसाहेब जवाळे ,आदी शिक्षक ,विद्यार्थी उपस्थित होते
