Breaking News

अभिव्यक्ती स्वातंत्र्य व पञकारीता यांचे विशेष महत्व


कर्जत/प्रतिनिधी/- भारताच्या संविधानामध्ये लोकशाही बरोबरच अभिव्यक्ती स्वातंत्र्य व पञकारीता यांचे विशेष महत्व आणि समाजाचे वास्तव चित्र आणि सामाजिक समस्या यांचे खरे चित्रण हे पत्रकारच व्यक्त करू शकतात. याचे सामर्थ्य पत्रकारांच्या लेखनीमध्ये असते. कर्जत तालुक्यातील बहुतांश पत्रकार हे दादा पाटील महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून त्यांचा सन्मान करण्याचा योग महाविद्यालयाच्या प्राचार्याला मिळणे समाधानकारक आहे. 

 असे वक्तव्य दादा पाटील महाविदयालयाचे प्राचार्य बाळ कांबळे यांनी पत्रकारदिनी कर्जत तालुक्यातील पत्रकारांच्या सत्कार करताना केले. ६ जाने रोजी बालशास्री जांभेकर यांची जयंती सर्वत्र पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनी सर्वत्र पत्रकारांचा सन्मान केला जातो. यावेळी दादा पाटील महाविद्यालयात सर्व पत्रकारांचा सन्मान करताना प्राचार्य कांबळे यांनी पत्रकार आणि समाज याविषयी आपले मनोगत व्यक्त करताना म्हंटले की, दिवसे -दिवस पत्रकारी क्षेत्रात मोठे आव्हान सोसत पत्रकार लिखानाचे काम करीत आहेत. समाजातील वास्तव टिपन्याचे खरे काम पत्रकार करत आहे. याच कामाची दखल घेत शासन स्तरावर पत्रकारासाठी अनेक कल्याणकारी योजना आमलात आणल्या जात आहे. पत्रकार म्हणून काम करताना असंख्य अडचणीवर मात करत वार्ताकनाचे काम सेवाभावी वृत्तीने करीत आहेत. यासह दादा पाटील महाविद्यालयातील एनसीसीचे प्रमुख मेजर संजय चौधरी यांनी सर्व पत्रकारांचा सन्मानचिन्ह देवून गौरव केला.

कर्जत नगरपंचायतीच्या वतीने नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी पत्रकारांचा सन्मान केला. यावेळी राऊत यांनी लेखणी आणि पत्रकार नाते हे अतूट असून या लेखणीच्या जोरावर पत्रकार समाजातील सत्य-असत्य बाहेर आणू शकतात. गेल्या दोन वर्षात कर्जत नगरपंचायतीला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहे. यामध्ये सर्वात मोठा वाटा हां प्रसिद्धी माध्यम म्हणून पत्रकारांचा असल्याचे नमुद केले. यासह तालुका कृषी विभाग आणि कर्जत बाजार समिती यांच्याकडून ही सन्मान करण्यात आला. यावेळी कर्जत तालुका ग्रामीणपत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष माळवे, मच्छिंद्र अनारसे, मुन्ना पठाण, डॉ अफरोज पठाण, निलेश दिवटे, संजय यादव, गणेश जेवरे., सुनिल कांबळे, मोतीराम शिंदे, महमद पठाण, महादेव सायकर, दत्ता उकिरडे, विश्वास रेणुकर, बबन म्हस्के, किशोर कांबळे, नाना साबळे, राहूल ढवाण, भाऊसाहेब तोरडमल, भास्कर भैलुमे, मिलिंद राऊत, दिलीप अनारसे, नामदेव फरांडे आदि उपस्थित होते.