कुख्यात गुन्हेगार सुदाम माळी एलसीबीच्या ताब्यात
शनिशिंगणापूर परिसरातील नौशाद सय्यद यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी चोरी करून सोन्याचे दागिने व मोबाईल चोरून नेला होता. या करीत मोबाईल विकण्यासाठी त्या चोरटयांनी माळी याकडे दिला होता. तोविकण्यासाठी नेवासा फाटा येथे आल्याचा सुगावा लागल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी संदीप पाटील, शरद गोर्डे, पोलीस कर्मचारी दत्तात्रर हिंगडे,सुनिल चव्हाण, उमेश खेडकर, रोगेश सातपुते, बाळासाहेब भोपळे, आदींच्या पथकाने सुदाम माळी यास अटक केली. आरोपी माळी यास शेवगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
