अहमदनगर - जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मागदर्शन केंद्रामार्फत , अहमदनगर, श्रीरामपूर व औरंगाबाद येथील एम आय डी सी मधील नामांकित कंपन्यांमध्ये विविध पदांसाठीच्या 228 जागाभरण्यात येणार आहेत. सदर जागा भरण्यासाठी दिनांक १८ जानेवारी २०१८ रोजी सकाळी १० वाजता रावसाहेब पटवर्धन स्मारक समिती सभागृह, समर्थ शाळेसमोर अहमदनगर येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती सहायक संचालक मुकणे यांनी एका पत्रकाद्वारे दिली. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मागदर्शन केंद्र,मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, सावेडी,अहमदनगर येथे संपर्क साधावा असे आवाहन सहायक संचालक मुकणे यांनी केले आहे.
जिल्हा कौशल्य विकास रोजगार मेळाव्याचे आयोजन
Reviewed by Dainik Lokmanthan
on
16:12
Rating: 5