Breaking News

भिडे यांनी फेटाळले दंगलीचे आरोप


भीमा- कोरेगाव भीमा दंगली प्रकरणातले आमच्यावर झालेले आरोप निराधार असून आम्ही कोणत्याही चौकशीला तयार आहोत, अशा शब्दात शिव प्रतिष्ठानचे संस्थापक भिडे यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावलेत. आजच्या लोकशाहीत मिळेल ती गोष्ट राजकारणा साठी वापरायची अशी राजकारण्यांना सवय लागली आहे. राजकीय नेते हे पवित्र गोष्टीचा चोथा करून खातात, अशी टीका भिडे गुरूजींनी केली.