Breaking News

पोलिस आणि पत्रकार एकाच नाण्याच्या दोन बाजू : तुरनर


कोपरगाव ता. प्रतिनिधी - समाजातील अपप्रवृत्ती रोखण्यासाठी पोलिस आणि पत्रकार दोघांचीही भूमिका महत्वाची आहे. दोघेही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे प्रतिपादन कोपरगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर तुरनर यांनी केले. पत्रकारदिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. 
यावेळी ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष, दै. लोकमंथनचे शहर प्रतिनिधी रोहित टेके, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोपरगाव तालुका अध्यक्ष लक्ष्मण वावरे, ज्येष्ठ पत्रकार जनार्दन जगताप, दै. लोकमंथनचे तालुका प्रतिनिधी गणेश दाणे, ज्येष्ठ पत्रकार संजय देशपांडे, पुंडलीक नवघरे, शंकर दुपारगुडे, दिपक जाधव, सिध्दार्थ मेहरखांब, रमेश भोंगळ, दिनेश जोशी, संजय लाड, राजाभाऊ जाधव, शिवाजी जाधव, प्रल्हाद मेहेरे, प्रेस फोटोग्राफर संजय भवर आदी पत्रकारांसह पोलिस कर्मचारी धिवर आर. के, पवार एस. सी., अशोक कुसाळकर, इरफान शेख आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र पोलिस स्थापना दिवस अर्थात ‘रेझिंग डे’च्या निमित्ताने डॉक्टर, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार व सामान्य माणसाला पोलिस प्रशासन हाताळण्याची संधी देण्यात अली होती. पोलिस प्रशासनाच्या कार्यपध्दतीची माहिती व्हावी, या उद्देशाने कोपरगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर तुरनर यांनी पत्रकारांना निमंत्रित करुन त्यांचा सन्मान केला. यावेळी उपनिरीक्षक सिद्धार्थ अहिरे यांच्या व तालुक्यातील पत्रकारांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे अंमलदारपदाचा कार्यभार काही काळ लक्ष्मण वावरे यांनी पाहिला. 

पोलिस दलाच्या स्थापना दिनानिमित्त जिल्हा पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या संकल्पनेतून कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक साहेबराव कडनोर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामेश्वर तुरणर, उपनिरीक्षक सिध्दार्थ आहिरे यांच्या नियोजनातून पोलिस ठाण्यात ‘रेझिंग डे’ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. पोलिसांच्या कामकाजाबद्दल ठराविक गुन्हांची उकल, गुन्हेगारी जगत व पोलिसांची असलेली भूमिका याबद्दलचे असलेले कुतुहल जाणुन घेण्यासाठी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना पोलिसांनी उत्तरे दिली.