शाखा अभियंत्यांचा उच्च न्यायालयाच्या भंगार मालमत्तेवरही डल्ला सुटीचा मुहूर्त साधून बापटांनी ऐंशी लाखावर केला हात साफ
मुंबई/विशेष प्रतिनिधी : शहर इलाखा शाखेचा मनोरा आमदार निवास इमारतीचा कोट्यावधी रूपयांचा गैरव्यवहाराने साबां अभियंत्यांची झोप उडाली असतानाच याच साबां विभागातील शाखा अभियंता विजय बापट यांनी उच्च न्यायालय सेवाकेंद्र येथील ऐंशी लाखाचे भंगार चोरून विकल्याचा प्रकार उघड झाल्याने सार्वजनिक बांधकाम खात्यात खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे सार्वजनिक बांधकाम खात्यातील अभियंत्यांची भ्रष्ट प्रवृत्ती किती शेफारली आहे. या प्रकरणाच्या समर्थनार्थ आ. वाघमारे यांनी पुरावे दिले आहेत. दरम्यान हा प्रकार उघड झाल्यानंतर साबांतील भ्रष्ट प्रवृत्ती न्यायमंदीरासारखे पविञ ठिकाणही सोडले नसल्याने या मंडळींची नीतीमुल्य किती हिन दर्जाचे आहेत हे सिध्द झाल्याची चर्चा सुरू आहे.
मनोरा आमदार निवास इमारतीच्या कामात कोट्यावधी रूपयांचा गैरव्यवहार उघड झाल्यानंतर शहर इलाखा सोबत अवघ्या साबांची इभ्रत चव्हाट्यावर आली. हे कमी झाले म्हणून की काय शहर इलाखा शाखेचे शाखा अभियंता व्हि.एस बापट यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील उच्च न्यायालय सेवाकेंद्राचे ऐंशी लाखाचे प्रकरण चव्हाट्यावर आले आहे. या प्रकरणाची कुणकुण आ. चरण भाऊ वाघमारे यांना लागल्यानंतर त्यांनी केलेल्या चौकशीत हा प्रकार अतिशय गंभीर असल्याचे वास्तव समोर आले. संबंधित शाखा अभियंत्याने 11फेब्रूवारी ते 12 फेब्रूवारी 2017 हे दोन सुट्टीचे दिवस हेरून संधी साधल्याचे आतापर्यंतच्या माहितीवरून निष्पन्न झाले आहे. शहर इलाखा शाखेच्या कार्यकारी अभियंत्यांपासून शाखा अभियंत्यांपर्यंत भ्रष्टाचाराचे जीवाणू वळवळ करीत असल्याचे अनेक प्रकरणांमधून उघड झाले असतांना थेट न्यायमंदिराच्या आवारातच या प्रवृत्तींनी हात मारल्याचे उघड झाल्याने साबांची उरली सुरली इभ्रतही गेट वे आफ इंडीयाच्या वेशीवर टांगली गेली आहे. शनिवारी सांयकाळी 6 वाजता मुख्य अभियंता श्री केडगे यांना, उपअभियंता श्री घाडगे यांनी, बंद लखोटयात अहवाल सादर केला. त्या अहवालामध्ये ज्या कंपनीच्या नावे, उच्च न्यायलयातून गेट पास बनविण्यात आला त्या कंपनीने प्रत्यक्षात अकरा गाडयांचा उल्लेख केलेले भंगार उचललेच नाही, असे लेखी पत्र मे. साईनाथ पेपर मार्ट मुंबई या कंपनीने दिलले आहे, असा वस्तूनिष्ठ सादर केडगे यांना सादर केला आहे.
सदर प्रकरणांमध्ये मुख्य अभियंता यांनी भंगार विक्रीबाबतचा अहवाल प्रधान सविच, सचिव यांना सादर केला आहे. प्रधान सचिवांनी कारवाईसाठी हा अहवाल सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना सादर केला आहे. सदर अहवाल मंत्री मोहदयांना सादर करून 15 दिवसांचा अवधी लोटला, तरी मंत्री मोहदय या कारवाई अहवालावर स्वाक्षरी करण्यात तयार नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणांत अधिकारी व मंत्रीमोहदयांची मिलीभगत असल्याचा संशय आता व्यक्त होऊ लागल्याची कुजबूज सुरू आहे.
उच्च न्यायालयातील भंगार प्रकरणी अडचणीत आलेले बापट यांनी मी वरिष्ठ अधिकार्यांना पैसे दिल्यामुळे माझे कुणीही वाकडे करू शकत नाही, अशी चर्चा घडवून आणत आहेत. श्रीमती वाळके यांना 20 लाख रुपये मी दिले आहेत. तसेच अरविंद सूर्यवंशी(एसी) ला 10 लाख रुपये दिले आहेत. तसेच 5 लाख रुपये श्रीनिवास जाधव यांना दिल्यामुळे माझे कोणीही वाकडे करु शकत नाही. सी. पी जोशी माझे नातेवाईक आहेत. सूर्यवंशी व सी.पी. जोशी वर्ग मित्र असल्यामुळे माझ्यावर कोणतीही कार्यवाही होणार नाही, अशी चर्चा बापट घडवून आणत आहे. बापट अशी चर्चा घडवून आणण्यामागे अधिकार्यांना बदनाम करण्याचा तर डाव नाही ना? की बापट यांच्या म्हणण्यानूसार अधिकार्यांचे बापट यांना अभय तर नाही ना? अशी चर्चा सुरू आहे.