Breaking News

स्वत:च्या चुकांमधून सातत्याने शिकत आले - दीपिका

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने शुक्रवारी आपला वाढदिवस साजरा केला. तूर्तास ती वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आपला चित्रपट पद्मावतीच्या प्रदर्शनाची अगदी आतुरतेने वाट पाहात आहे. अलिकडेच चित्रपटाच्या प्रमोशनल इंटरव्ह्यूदरम्यान दीपिकाने सांगितले की, तिने कधीही शिकणे बंद केलेले नाही. ती आपल्या चुका व लोकांच्या सल्ल्यांद्वारे सातत्याने शिकत आहे. 


फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक दशक पूर्ण केलेल्या दीपिकाने आपल्या या प्रवासाविषयी बोलताना सांगितले की, ज्या दीपिकाचा प्रवास ओम शांती ओमद्वारे सुरू झाला होता, आजही मी तीच दीपिका आहे. मी आपला हा प्रवास प्रत्येक क्षणी जगले आहे. मला ठाऊक आहे की, पूर्वी मी काय होते व कोणत्या दिशेने जात होते ते. मी सातत्याने शिकत आहे. मला शिकण्याचा छंद पूर्वीपासूनच लागलेला आहे. मी तेव्हा आपल्या चुका व लोकांच्या सल्ल्यांद्वारे शिकायचे. आजही मी तेच करत आहे. काही नवीन शिकताना सातत्याने स्वत:मध्ये सुधारणा करण्याची माझी इच्छा आहे. 

जर लोकांना माझ्यामध्ये काही उणिवा दिसत आहेत, तर मी त्याच उणिवांवर फोकस करून त्या दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. मला नेहमी काही तरी नवीन व वेगळे करण्यास आवडते. माझा हा प्रयत्न काळाबरोबर पुढेही सुरू राहील. माझे स्वत:शी एका कलाकाराच्या रूपात बोलणे होते. दरम्यान आपला चित्रपट पद्मावतीतील व्यक्तिरेखेविषयी बोलताना दीपिका म्हणाली, ही व्यक्तिरेखा अत्यंत आव्हानात्मक आहे. राणी पद्मिनी बुद्धिमान, साहसी, महान महिला होती. तिने आपल्या समाजाकरिता खूप काही केले. ज्यामुळे तिची आज पूजा केली जाते.