Breaking News

आफ्रिकेला डेल स्टेनच्या रूपात धक्का,डेल स्टेन मालिकेबाहेर


केपटाऊन : पहिल्या कसोटीत आघाडी घेणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला डेल स्टेनच्या रूपात धक्का बसला आहे. टाचेला झालेल्या दुखापतीमुळे स्टेनला दुसऱ्या दिवशी मैदान सोडावे लागले होते. वैद्यकीय चाचणीत दुखापत गंभीर असल्यामुळे स्टेनवर मालिकेबाहेर पडण्याची वेळ आली आहे..२०१६ मधील पर्थ कसोटीत स्टेनच्या खांद्याला क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. परिणामी, स्टेन जवळपास वर्षभर मैदानाबाहेर होता. खांद्याच्या दुखापतीवर मात करून पुनरागमनाच्या दृष्टीने स्टेनला भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत स्थान देण्यात आले. स्टेनने सलामीवीर शिखर धवन आणि रिद्धिमान साहाला बाद करत आपले पुनरागमन यशस्वी ठरवले. १८ व्या षटकातील तिसरा चेंडू टाकल्यानंतर टाचेच्या दुखापतीने तोंड वर काढले.