Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाच्या चिटणीस पदी अभिजित ढाकणे


अहमदनगर - कर्तृत्व हीच खरी माणसाची ओळख असून जनसामान्यांची सेवा हा खरा अलंकार आहे. आपण कोणत्याही पदावर असलो तरीही सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक हे आपले उद्दिष्ट असलेपाहिजे.स्वकर्तृत्व मनुष्यास उज्वल भविष्य देते. जनताही त्याच व्यक्तीच्या पाठीशी उभी राहते असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे आमदार संग्रामभैय्या जगताप यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाच्या चिटणीस पदी अभिजित ढाकणे यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीचे पत्र संग्राम जगताप यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी आमदार अरुणकाकाजगताप, दादाभाऊ कळमकर, माणिकराव विधाते, जिल्हाध्यक्ष अमितदादा खामकर, आकाश दळवी, वैभव ढाकणे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना अमित खामकर म्हणाले राष्ट्रवादी सदैव विदयार्थ्यांच्या पाठीमागे सक्षमने उभी आहे. महानगर पालिकेचे विविध प्रश्न, अडचणी सोडवण्यासाठी , विविध मेळावे आदींच्या योजनेसाठी राष्ट्रवादीविद्यार्थी संघटना नेहमी तत्पर असते. संग्राम जगतापांच्या मार्गदर्शनाखाली असेच समाजाभिमुख काम विद्यर्थी संघटना सदैव करत राहणार आहे.

नियुक्तीचे पत्र स्वीकारल्यानंतर ढाकणे म्हणाले ओबीसी विभागाची मोठी जबादारी माझ्यावर आली आहे. यांच्या ज्या समस्या असतील त्या सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असून प्रयत्नशील तरुणांची एकभक्कम फळी उभा करून ही युवा शक्ती समाजउभारणीसाठी कामी आणणार आहोत.