Breaking News

भिंगार भाजपच्यावतीने दिनदर्शिकाचे वाटप


शासनाच्या मेकइनइंडिया,जनऔषधीयोजना ,बेटी बचाव बेटी पढाव, किसान विकास पत्र, स्किल इंडिया, पंतप्रधान आवास योजना, आदिवासी कन्यादान, अल्पसंख्यांक समुदाय योजना, दिव्यांग अवयव पुरव योजना, शौचालय अनुदान योजना, कौशल्य (ग्रामीण) योजना, पंतप्रधान कृषी सिंचन योजना, मुद्रा योजना,पंतप्रधान उज्वल योजना,घरगुती गॅस सबसिडी योजना, पीक विमा सुरक्षा योजना, जीवन ज्योत योजना, अटल पेंशनयोजना, पंतप्रधान ग्राम सडक योजना सर्व योजनांचा व इतर योजनांची माहिती असणाऱ्या दिनदर्शिकांचे वाटप भिंगार भाजपच्या वतीने नुकतेच करण्यात आले.
सरकारच्या योजना दिनदर्शिकेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचवण्याचा उपक्रम उल्लेखनीय असल्याचे मत शिवाजीराव दहीहंडे व नगर शहर चिटणीस वसंत राठोड यांनी यावेळी व्यक्त केले.नगर जिल्ह्यामध्ये खासदार दिलीप गांधी यांच्या प्रयत्नांनी केंद्र सरकारकडून प्राप्त निधी या संदर्भातही माहिती दिनदर्शिकेमधून नमूद करण्यात आलेली आहे . यावेळेस मंडलअध्यक्ष शिवाजीराव दहीहंडेे,वसंत राठोड, गणेश साठेे, सचिन दळवी,किशोर कटोरे, कैलास गव्हाने,दिनेश शेरकर, सुरेश तनपुरे,शिवकुमार वाघुबरे, महेंद्र जाधव,देवेंद्र राहिज आदी कार्यकर्ते उपस्थित होत.