Breaking News

जळगावात बेकायदा दारू जप्त; दोघे अटकेत

जळगाव- देशी दारूची बेकायदा वाहतूक होत असताना बाजारपेठ पोलिसांनी केलेल्या कारवाईत पाच लाखांच्या वाहनासह पाच हजार रुपये किंमतीची टँगो पंच दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली.

निखील राजपूत व व अशोक राणे अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, एएसआय आनंदसिंग पाटील, कॉन्स्टेबल संजय भदाणे आदींनी केली.